अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना धक्का, ठाकरे गटातील नेता भाजपच्या गळाला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मशाल विरुद्ध कमळ अशी लढत पहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी भाजपने उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अवधूत तटकरे यांनी मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अवधूत तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, “माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेण्याचं एकच कारण म्हणजे देशात असलेलं पंतप्रधान मोदींचं नेतृत्व आणि राज्यात नव्याने आलेलं सरकार हे राज्याला प्रगतीपथावर नेत आहे. भाजपची रायगड जिल्ह्यात वाढ कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील. भाजपत प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. कोणत्याही पदाची मी अपेक्षा केली नाहीये मात्र, संघटनेत जी काही जबाबदारी देण्यात येईल ती मी पार पाडेल.”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं, “चार नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले अवधूत तटकरे यांनीही भाजपत प्रवेश केला. अवधूत तटकरे हे कोकणातील चांगले नेतृत्व आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात, रायगड जिल्ह्यात पक्षाला मजबुती देण्याचं काम अवधूत तटकरे यांच्या माध्यमातून होईल.”

अवधूत तटकरे यांचा अल्प परिचय….
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुतणे
2015 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन मतदारसंघातून आमदार
आमदार होण्यापूर्वी रोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष
सुनील तटकरे यांच्यासोबत मतभेदानंतर अवधूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.
2019 मध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरेंच्या कन्या अदिती तटकरे विजयी

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….