रामदास आठवलेंना मोठा धक्का!, आठवले गटातील या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आंबेडकर चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे प्रवेश केला. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या खूप कार्यरत झाल्या आहेत.
अंधारे या त्यांच्या वेगळ्या भाषणशैलीसाठी खास करून ओळखल्या जातात. तसेच आपल्या भाषणातून त्या शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करत आहेत. त्यातच आता दुसरीकडे आठवले गटाचे माजी प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी रामदास आठवले यांना जयभीम करत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अशोक गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे. यावेळी अशोक गायकवाड यांच्या सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे. अशोक गायकवाड हे आंबेडकरी चळवळीचे आणि बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते आहेत. अशोक गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. अशोक गायकवाड हे कधीकाळी आठवले यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. चळवळीतील नेतृत्व असल्याने गायकवाड यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे आठवले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून ठाकरेंना याचा फायदा होणार आहे. तसेच अशोक गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….