अनिल देशमुखांची होणार अँजिओग्राफी ; जसलोक रुग्णालयात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
अनिल देशमुख यांनी खाजगी रुग्णालयात उपचार मिळावेत, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती.
न्यायालयाने देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास परवानगी दिलेली आहे. अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांची खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांना आज जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ईडीने केलेल्या कारवाईत अनिल देशमुख यांन ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जामीन मंजूर करण्यात आला. परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अद्याप जामीन नाही. सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर करावा, यासाठी अनिल देशमुख प्रयत्न करत आहेत. शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. यातच त्यांचं गृहमंत्रीपद गेलं होतं. ईडीने या प्रकरणात ईसीआयआर दाखल केला होता. या प्रकरणात वर्षभर ते आर्थर रोड तुरुंगात होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….