मी आता मंत्री होईल नाही तर…, आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला, तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजूनही पार पडलेला नाही.
पहिल्या टप्प्यात मंत्रीपदापासून वंचित राहिलेले अनेक आमदार मंत्रीमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
अशातच अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरून एक मोठं विधान केलंय. मंत्रिमंडळात विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, ‘मी काय प्रमुख आहे का? शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचा प्रहार पक्ष लहानसा पक्ष आहे’, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
आमदार बच्चू कडू हे आज अमरावती येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडूंना मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला, यावर ‘मी आता मंत्री होईल नाही तर अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल, असं उत्तरही बच्चू कडू यांनी दिलं’. बच्चू कडू यांच्या या विधानानंतर ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मीडियावरच आगपाखड
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चक्क बच्चू कडू यांनी मीडियावरच आगपाखड केली.
शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. चला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दाखवतो, तुम्ही माहिती घेत नाही, संशोधन केलं पाहिजे. किती जणांच्या खात्यात पैसे आले ते तुम्हाला दाखवून देतो, असं बच्चू कडू म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….