‘भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार’ ; शिंदे गटाच्या चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेची बोचरी टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळालेलं ढाल तलवार चिन्ह म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ( BJP) ढाल आणि गद्दारीची तलवार असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नव्याने पक्ष चिन्ह आणि नावाचं वाटप झाल्यानंतर अमरावती येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पहिला ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी अमरावतीमधील उद्धव ठाकरे गटांने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.
दरम्यान, अमरावतीच्या राजकमल चौकात दानवे यांचे नेतृत्वात ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह पेटवत रणशिंग देखील फुंकल. त्यानंतर जय भारत मंगल कार्यालयात ठाकरे गटाचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा पार पडला.
यावेळी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं शिंदे गटाला ढाल तलवार हे भारतीय जनता पार्टीचे ढाल आणि गद्दारीची तलवार शिंदे गटाच्या निशाणीवर आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. तर आम्हाला मिळालेलं चिन्ह हे क्रांतीची मशाल आहे. या मशालीत पडणाऱ्या ठिणगीमध्ये विरोधक भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही असं देखील दानवे यावेळी म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….