एसटी कर्मचाऱ्यांना “संप” काळातील कपातीची रक्कम मिळणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनासाठी 8 आणि 9 जून 2018 रोजी संप केल्याने एक दिवसाच्या संपासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आठ दिवस असे एकूण दोन दिवसांसाठी 16 दिवसांची वेतन कपात महामंडळाने केली होती; परंतु मुंबई औद्योगिक न्यायालयाने आता एका दिवसाच्या संपासाठी दोन दिवसच कपातीचा निर्णय दिला आहे.
त्यामुळे चार दिवसांची कपात वगळता इतर 12 दिवसांचे वेतन मिळणार आहे.
वाढीव वेतनासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जून 2018 असे दोन दिवस राज्यव्यापी संप केला होता. यामुळे एसटीची प्रवासी वाहतूक कोलमडली होती. त्यानंतर महामंडळाने नियमांवर बोट ठेवत एका दिवसाच्या संपासाठी आठ दिवस असे दोन दिवसांच्या संपासाठी 16 दिवसांच्या वेतनाची कपात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली केली होती. पण या विरोधात कर्मचाऱ्यांनी मुंबई औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती. राज्यातील अनेक विभाग नियंत्रक कार्यालयांनी ही कपात 16 दिवस केली असली तरी काही विभाग नियंत्रक कार्यालयांनी मात्र “नो वर्क नो व्हेजेस’ सूत्रानुसार दोनच दिवसांची वेतन कपात केली होती. या मुद्यावर काही कामगार संघटना मुंबई औद्योगिक न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने एका दिवसाच्या संपासाठी दोन दिवस वेतन कपातीचा निर्णय दिला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….