अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी ; पोलिसांकडून दोघांना अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा खुलासा झाला होता.
सिद्धूच्या आधीच लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपवण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सतत तपास कार्य सुरु ठेवला आहे. दरम्यान आता दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या संशयितांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे.
अलीकडेच पंजाब पोलीस मुख्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी मोड्यूलच्या दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्या या दोन संशयितांपैकी एक अल्पवयीन मुलगा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये पोलिसांकडून शोध घेतला जात होता.
दरम्यान आता याच अल्पवयीन मुलाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली असल्याचं उघड झालं आहे.
दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने 4 ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करत हरयाणामध्ये काही स्फोटक उपकरणे जप्त केली होती. सोबतच अर्शदीप सिंग या अल्पवयीन मुलाला स्फोटके बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी केलेल्या विचारपूसमध्ये याच अर्शदीपचा वापर करत लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानची हत्या करण्याचा कट रचल्याचा खुलासा झाला आहे.
यामध्ये पंजाबचा गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या टोळीचादेखील खास संबंध असल्याचं समोर आलं आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या हत्येच्या कटकारस्थान प्रकरणात जग्गू भगवानपुरियाने दीपक सुरकपूर आणि मोनू डागर या दोघांनाही सहभागी करुन घेतलं होतं. परंतु सध्या दीपिक हा फरार आहे.तर मोनू डागर तुरुंगात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानला मारण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय.
याआधीही लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्याचा तब्बल दोनदा प्रयत्न केला आहे. सलमान खान सतत आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात असतो. याचाच फायदा घेत लॉरेन्सने फार्म हाऊसवरच अभिनेत्याला संपवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या कटकारस्थानात सलमान खानला कोणतीही इजा झाली नाही.
त्यानंतर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खान आणि वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. यामध्ये सलमानला ‘तुझा सुद्धा सिद्धू मुसेवाला होणार’ अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिस शक्य ती काळजी घेत आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….