काश्मीरमधील परिस्थितीला तीन घराणे जबाबदार, अमित शाह यांचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कलम ३७० रद्दबातल ठरवण्याच्या निर्णयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर भागात एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी तीन घराण्यांमुळेच जम्मू-काश्मीरचा परिसर दहशतवादी कारवायांमुळे धुमसत राहिला, अशी टीका केली.
मागील ७० वर्षांमध्ये ४२ हजार सामान्य नागरिकांना येथे जीव मगवावा लागला. या मृत्यूंसाठी कोण जबाबदार आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अब्दुल्ला, मुफ्ती आणि गांधी या तीन घरण्यांकडे अमित शाह यांचा रोख होता. हे तिन्ही घराणे जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीला कारणीभूत आहेत, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या पार्श्वभूमीवर येथे कोणत्या वर्षी किती दहशतवाद्यांना कंटस्नान घातले गेले. तसेच किती नागरिकांचा मृत्यू झाला यावर एक नजर टाकुया.
१९९०-२००१ : परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर भागात १९९० ते १ डिसेंबर २००१ या कालावधित एकूण ५१७८ दहशतवादाशी संबंधित कारवाया करण्यात आल्या. या कारवायांदरम्यान एकूण ९७१८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३०५३ सुरक्षा जवानांचा कारवाईमध्ये मृत्यू झाला. या कारवायांमध्ये एकूण १४३५६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये २३५८ परदेशी दहशतवादी होते. या काळात १९९६ साली सर्वाधिक म्हणजेच १३३६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २००१ साली सर्वाधिक म्हणजेच २०२० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
२००२ साली १००८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ४५३ सुरक्षा जवान शहीद झाले होते. या साली १७०७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील कारवायांसंदर्भात २००४ साली एक वार्षिक अहवाल जारी केला होता. या अहवालानुसार दहशतवादाविरोधातील कारवायांदरम्यान २००२ ते २००३ या काळात ९९४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २००३-२००४ या काळात हा आकडा ७५३ वर होता. २००२-२००३ साली ४३३ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. तर २००३-२००४ या हा आकडा ३२६ होता. २००२-२००३ साली १५३६ तर २००३-२००४ साली १४९१ दहशदवाद्यांना ठार करण्यात आले होते.
२००४ ते २००९ या काळात १९८० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर विशेष दलाच्या ८७० जवानांचा या काळात मृत्यू झाला होता. २००४ ते २००९ या कालावधित ३५३४ दहशतवादी ठार झाले होते. २०१० साली सुरक्षा दलाचे जवान, नागरिक तसेच दहशतवाद्यांच्या मृत्याचा आकडा अनुक्रमे ६९, ४७ आणि २३२ असा आहे. २०११ साली सुरक्षा दलाचे ३३ जवान शहीद झाले. ३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर १०० दहशतवादी ठार झाले होते. २०१२ साली सुरक्षा दलाचे १५ जवान, १५ नागरिकांचा मृत्यू तर ७२ दहशतवादी ठार झाले होते. २०१३ ते २०१७ या कालवधित सुरक्षा दलाचे ३०१ जवान शहीद झाले. ११५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ६४८ दहशतवादी या काळात ठार झाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….