मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक ; पीएम मोदींचा कुटुंबियांना फोन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- समाजवादीचे पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव सध्या रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे.
मेदांता रुग्णालयाने हेल्थ बुलेटिन जारी करुन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत.
मुलायमसिंह यादव यांना ताप आणि पोटात संसर्ग झाल्याने मेदांता येथे दाखल करण्यात आले होते. मागील एक महिन्यापासून ते रुग्णालयात असून त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, रविवारी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मुलगा अखिलेश यादव आणि सून डिंपल यादव हे तातडीने लखनऊहून दिल्लीला पोहचले आहेत. तर, सपाच्या बड्या नेत्यांशिवाय पक्षाचे कार्यकर्ते व विरोधी पक्षातील नेतेही त्यांची भेट घेत आहेत.
मुलायम सिंह यादव यांना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही भेट दिली आहे. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून मुलायम सिंह यांची प्रकृतीची विचारपूस केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….