अनिल देशमुखांना जामीन मिळणार का..? कोर्टानं CBI ला दिले ‘हे’ आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं त्यांच्या अर्जाची दखल घेत त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांना कालच ईडी कोर्टानं जामीन मंजूर केला. पण त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. कारण सीबीआयकडूनही याच खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळं जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.
दरम्यान, सीबीआयनं कोर्टानंही आपल्याला जामीन मंजूर करावा यासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ईडीनं त्यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळं विशेष पीएमएलए कोर्टाप्रमाणं सीबीआय कोर्टानंही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी त्यांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर देशमुख सुमारे वर्षभरापासून मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….