धनुष्यबाण कुणाचं…? निवडणूक आयोगातून मोठी बातमी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार तोफ डागली. पण, आता शिवसेनेचे पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आता उद्या 7 सप्टेंबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात उद्या शुक्रवारी 7 सप्टेंबरला निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कागदपत्रं सादर करणार आहे. एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य सोबत असल्याचं सांगत आहे.
शिंदे गटाने विधिमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्यासोबत असल्याचं सांगत आहे आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाने आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली होती. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलीपी द्याव्यात असे आदेश दिले. शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. अजूनही दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूकक जाहीर झाली आहे, त्यामुळे अशा स्थितीत आयोगाला काय निर्णय घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे. शिवसेनेनंही मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहण्याचे ठरणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….