अजानचा आवाज आल्यानंतर अमित शाहांनी थांबवलं भाषण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जम्मू-काश्मीर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बारामुल्ला येथे भाषण केलं. परंतु या जाहीर सभेत बोलताना अचानक सुरू झालेल्या अजानसाठी भाषण मध्येच थांबवलं आणि अजान संपल्यानंतर अमित शाहांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.
अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे जाहीर सभेला संबोधित केलं. दरम्यान जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आल्याने अमित शाह यांनी आपले भाषण मध्यंतरी थांबवले आणि अजान संपल्यानंतर शाहांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली.
काय म्हणाले अमित शाह?
अमित शाह म्हणाले की, मला नुकताच संदेश मिळाला की, जवळच्या मशिदीत प्रार्थनेची वेळ झाली आहे, आता संपली आहे मग आता बोलू का? अशी जनतेची परवानगी घेऊन त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
1947 ते 2014 पर्यंत केवळ चार वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली आणि 2014 ते 2022 पर्यंत 9 महाविद्यालये सुरू झाली. तीन घराण्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला, असं म्हणत त्यांनी अब्दुल्ला, मुफ्ती आणि गांधी कुटुंब या तीन कुटुंबांवर जोरदार निशाणा साधला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….