मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना पुन्हा धमकीचे फोन, जीवे ठार मारण्याची धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलयेथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.
रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली असून मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 12.57 वा. सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल च्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता.
सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. सदर धमकीच्या अनुषंगाने डॉ डी बी मार्ग पोलिस ठाणेस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्तुत प्रकरणी अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
याआधीही ऑगस्ट महिन्यात मुकेश अंबानी यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती. भौमिक नावाच्या या मनोरुग्णाने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या मानसिक रुग्णाने 7 ते 8 वेळा फोन केले होते. दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता जामिनावर सोडण्यात आले होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….