दसरा मेळाव्यासाठी निवृत्त पोलिसांची ‘विशेष’ फौज तैनात; २० हजार पोलिसांचा फौजफाटा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईपोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांच्या दिमतीला वर्षभरात निवृत्त पोलिसांची विशेष फौजदेखील तैनात करण्यात आली आहे.
स्थानिक कार्यकर्ते, खबऱ्यांमार्फत पोलीस अंदाज घेत आहेत. परिमंडळ उपायुक्तांनी वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची मेळाव्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करावी, असे आदेश जारी केले आहेत. बीकेसी मैदानात मुंबई पोलिसांसाठी एक मॉनिटर रूम तयार करण्यात आली आहे.
२० हजार पोलिसांचा फौजफाटा
एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी बंदोबस्तासाठी ३२०० अधिकारी, १५ हजार २०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे १५०० जवान, एक हजार गृहरक्षक दल, शीघ्रकृती दलाच्या २० पथके, १५ बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात येणार आहेत. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दोन्ही ठिकाणी भेटी देऊन पोलिसांच्या तयारीची पाहणी केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….