उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाकडून ‘ती’ मागणी मान्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची धनुष्यबाण कुणाला मिळणार?
यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं असतानाच, एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. माहितीनुसार, ७ ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आता ठाकरे गटाला मुदत मिळाली आहे.
२३ सप्टेंबरला ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी (Maharashtra News) निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला वेळ वाढवून दिली आहे. २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती.
त्यानंतर शिवसेनेकडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी मान्य करत ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपलं म्हणणं ७ ऑक्टोबरपर्यंत मांडावं लागणार आहे.
ठाकरेंना धनुष्यबाण मिळून नये म्हणून शिंदे गटाची नवी चाल?
अंधेरी पूर्वच्या (Andheri) पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे. ठाकरे गटाला धनुष्यबाण (Shivsena) चिन्ह मिळू नये म्हणून आता शिंदे गटाकडून सुद्धा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टिव्हीला दिली आहे.
एकाच चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाची काल वर्षा निवास्थानी बैठक झाली. या बैठकीत ही रणनिती झाली असल्याची माहिती आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….