मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री ; पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या (Dussehra 2022) मुहूर्तावर सीएम केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची घोषणा करतील, असं मानलं जात आहे.
विजयादशमी दिवशी 5 ऑक्टोबरला हैदराबाद तेलंगणा भवनमध्ये (Hyderabad Telangana Bhavan) टीआरएस (TRS) पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, सीएम केसीआर हैदराबादच्या बैठकीनंतर राष्ट्रीय राजकारणाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल बोलू शकतात. पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार असल्याचंही मानलं जात आहे.
केसीआर 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानीत जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. टीआरएस नेते श्रीधर रेड्डी म्हणाले, “देशातील लोक एक मजबूत आणि चांगलं नेतृत्व शोधत आहेत. कारण, एनडीए सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे.” तर, दुसरीकडं तेलंगणा पीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष आणि माजी खासदार मधू गौड यास्की म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी तेलंगणातील जनतेचा विश्वासघात केलाय आणि आता ते देशाच्या जनतेचा विश्वासघात करू इच्छित आहेत, अशी त्यांनी टीका केलीय.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….