उद्धव ठाकरेंचं खरं ठरलं ; ‘तो’ दावा भाजपच्याच अंगलट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- रमेश वाळुंज हे नाव अचानकच माध्यमात चर्चेत आले आहे. २१ तारखेला मुंबईतील नेस्को मैदानावर गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात रमेश वाळुंज या व्यक्तीचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक म्हणून केला होता.
त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी रमेश वाळुंज हे शिवसैनिक नव्हते तर सच्चे भाजपा कार्यकर्ता होते, असा दावा केला. यावर रमेश वाळुंज यांच्या पत्नीनं आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावरुन भाजपा-शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
कोण होते रमेश वाळुंज? : रमेश वाळुंज हे मुंबईतील एक गृहस्थ होते. २०१६ साली मुंबईतील बँन्डस्टँड परिसरात त्यांनी समुद्रात बुडणाऱ्या तीन मुलींना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. त्यातील दोन मुलींना वाचवण्यात त्यांना यश आले, मात्र तिसऱ्या मुलीला वाचवताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. हेच रमेश वाळुंज एक शिवसैनिक होते, असा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या गोरेगावातील गटप्रमुख मेळाव्यातील भाषणात केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटले होते की, काही वर्षांपूर्वी वांद्रा येथील वाळुंज यांच्या घरी गेलो होतो. रमेश वाळुंज यांनी बुडणाऱ्या मुलींना हिंदू आहे की मुस्लीम आहे, मराठी आहे की अमराठी आहे हे न पाहता वाचवलं होतं, असेही म्हटले आहे. दोन मुलींना वाचवलं होतं. तिसऱ्या मुलीला वाचवताना त्या मुलीचा आणि वाळुंज यांचा मृत्यू झाला होता. शिवसेनेनं रमेश वाळुंज यांच्या पत्नीला नोकरीला दिली आधार दिला, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
आशिष शेलारांचा ठाकरेंवर निशाणा : “बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले.”
रमेश वाळुंज यांच्या पत्नीने शेलारांचा खोडला दावा
रमेश वाळुंज यांच्या पत्नी कल्पना वाळुंज यांनी पत्रकार परिषद घेत आशिष शेलारांचा दावा खोडून लावला आहे. त्या म्हणाल्या, मी जेव्हा वर्तमान पत्रात आशिष शेलारांच विधान वाचल. माझे पती हे सुरुवातीपासूनच शिवसेनेत होते. ते शिवसैनिक होते. हे जे राजकारण सुरु आहे. ते मुळाच चूकीचे आहे, अशी प्रतिक्रिया कल्पना वाळुंज यांनी दिली आहे. शिवाय माझ्या पतीच्या निधनानंतर उद्धव ठाकरे स्वत: आमच्या घरी आले, त्यांनी आमचं सांत्वन केलं. याच काही काळात त्यांनी आम्हांला मदतही केली, असा भावनाही कल्पना वाळुंज यांनी माध्यमात बोलून दाखविली.
पुन्हा शेलारांचा ट्वीटव्दारे स्पष्टीकरण
भाजपा नेते आशिष शेलारांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत ठाकरेंना सुनावलं आहे. त्यांनी ट्वीटरवर एक निवदेन जारी करत आपल्या ट्वीटमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पुढे करुन आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असे म्हटले आहे.
मुंबई महापालिकेसाठी आरोप- प्रत्यारोप ?
२५ वर्ष घरोबा करुन बसलेले शिवसेना-भाजपा महाराष्ट्राच्या राजकारणातले याघडीचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी झाले आहेत. एकनाथ शिंदेंना फोडून आणि तीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत भाजपाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला हिणवलं जाते. त्यातच आता एका मृत कार्यकर्त्याच्या दिलेल्या बलिदानावरुनही भाजपा-शिवसेनेत राजकारण रंगलेलं दिसले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने आणि मुंबई महापालिकेसारखी सोन्याची कोंबडी ताब्यात मिळवण्यासाठी राजकारण आणखी कुठल्या थराला जाईल, हे आता सांगणे कठीण आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….