तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सावंतांचे व्यक्तव्य.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान विधानावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तानाजी सावंत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असून त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे ते म्हणाले.
चंद्रकात पाटील काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीसांमुळेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारला ही केस न्यायालयात व्यवस्थित चालवता आली नाही, त्यामुळे हे आरक्षण गेलं. अशा वेळी अडीच वर्षा तुम्ही आंदोलनं का केली नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन केले असते, असं तानाजी सावंताना म्हणायचे होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?
“रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली होती. मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”, असे ते म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…