राष्ट्रवादीत लवकरच स्फोट :- बावनकुळे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे, दि. 24 – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट होण्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना गृहमंत्रीपद हवे होते, त्यांची योग्यता असूनही हे मंत्रीपद दिले गेले नाही.
हीच राष्ट्रावादीमध्ये धुसफूस आहे. लवकरच एक दिवस ती राजकीय स्फोट घडवून बाहेर पडतील, असेही ते म्हणाले.
बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांना कॉंग्रेस व शिवसेनेनेही मंत्रिपद दिले नाही. म्हणून राज्य अडीच वर्ष मागे पडले. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत बावनकुळे म्हणाले, “”केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 144 मतदारसंघामध्ये मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. त्याच निमित्ताने बारामतीमध्ये सीतारामन यांचा दौरा झाला. आगामी निवडणुकीमध्ये आम्हाला बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडायचे आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास आहे. एकनाथ खडसे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये जातील, अशी चर्चा असतानाच बावनकुळे यांनी मात्र आपल्याला माहीत नसल्याचे सांगत या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
“खोटं बोल; पण रेटून बोल’
आदित्य ठाकरे यांचे तळेगाव येथील आंदोलन म्हणजे “खोटं बोल; पण रेटून बोल’ असा प्रकार आहे. महविकास आघाडी सरकारने वेदांत फाक्सकॉनसाठी जागा नक्की केली होत, तर मग त्यांनी एमओयू घेऊन आंदोलनाला यावे. जागा संपादन केल्याचा शासन आदेश दाखवावा. मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत त्यामुळे लवकर निर्णय झाला नाही. महाराष्ट्राची दिशाभूल करू नका,असे बावनकुळे म्हणाले.
“पीएफआय’वर बंदी घाला
पाकिस्तान झिंदाबाद म्हणणारे जिथे असतील तेथून शोधून काढू. त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणार आहे. आमचे सरकार संवेदनशील सरकार आहे, ही कारवाई नक्की करेल, असे बावनकुळे म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…