लहान मुलांच्या ICU वॉर्डमध्ये लागली आग; अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या आयसीयू कक्षाला ही आग लागली.
यानंतर तात्काळ अग्निशामक दल रुग्णालयात दाखल झालं. वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही
ही आग लहान मुलांच्या आयसीयू वार्डात लागल्याने इथे असलेल्या लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वार्डात शिफ्ट करण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या आगीमध्ये दोन बालकं किरकोळ जखमी झाली आहेत.
त्यांना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतरअमरावती दौऱ्यावर आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी याठिकाणी पाहणी करून घटनेची माहिती घेतली आहे रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नाना पटोले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, की सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री आहे.
प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा समन्वयक नाही. शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. लोकशाहीची थट्टा शिंदे आणि भाजप सरकारकडून होत आहे. पालकमंत्री स्पायडरमॅनसारखे काम करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…