अखेर मुहूर्त सापडला, पालकमंत्री ठरले! राज्य सरकारकडून जिल्हानिहाय यादी जाहीर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात नवे सरकार स्थापन झाले खरे, पण जवळपास तीन महिने होत आले तरी पालकमंत्रीपदाची नेमणूक करण्यात आली नव्हती. अखेर राज्य सरकारला मुहूर्त सापडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून गिरीश महाजन यांची धुळे, लातूर, नांदेडवर बोळवण करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे –
राधाकृष्ण विखे पाटील- नगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील – पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत – परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…