नेर येथे 30 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 23 सप्टेंबर :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ, व नेहरु महाविद्यालय, नेरपरसोपंत यांचे संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2022 रोजी नेर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्या करीता एकूण 432 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहे. सदरची रिक्तपदे ही विविध नामांकित कंपन्याकडुन ( उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, नवकिसान बायो प्लॅनटेक प्रा.लि. नांदेड ,नवभारत फर्टिलायझर, प्रा.लि. अमरावती, डिस्टील एज्चुकेशन प्रा.लि. नागपूर, टिएम ॲटोमोटीव्ह पुणे, कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लि. नागपुर नेट ॲम्बीट, नागपुर) उपलब्ध झालेली आहे असुन रोजगार मेळाव्याचे दिवशी सदर कंपनीचे अधिकारी / एच आर उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहे.
सदर मेळाव्यामध्ये 10वी, 12वी, आय.टि.आय., पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे.
सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविणे करीता https://forms.gle/Kx7cnDKFyhpBWU8n7 या गुगल लिंकचा वापर करावा व आपला सहभाग नोंदवून प्रत्यक्ष मेळाव्याचे ठिकाणी म्हणजेच नेहरु महाविद्यालय, बाभुळगाव रोड, जूने तहसील जवळ नेर ता. नेर जि.यवतमाळ येथे दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी आवश्यक शैक्षणिक दस्ताऐवजांच्या छायांकित प्रती व रिझ्युम / बायोडाटा पासपोर्ट फोटोसह मुलाखती करीता उपस्थित राहावे, असे आवाहन वैशाली पवार, प्रभारी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…