मुख्यमंत्र्यांचा दिल्ली मुक्काम एक दिवसाने वाढला ; पंतप्रधानांची भेट होण्याची शक्यता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजधानी दिल्लीतील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल (21 सप्टेंबर) रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमवीर पंतप्रधान मोदी यांची भेट होणार का, झालीच तर भेटीत काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे. याशिवाय राज्यातल्या राजकारणावर दिल्लीत खलबतं होणं स्वाभाविक आहे. या गाठीभेटींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी
दिल्लीतला मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे.
मुख्यमंत्र्यांचा मुक्काम वाढल्याने चर्चांना उधाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते काल रात्रीच मुंबईला येणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी स्वतःहून हा मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे, त्यामुळे चर्चा आणि शक्यतांचा पूर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मुक्काम अचानक का वाढवला? त्यामागे पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचं कारण तर नाही ना? जर मुख्यमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थेट भेटणार असतील त्यांना आता देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही का? असाही प्रश्न निर्माण होत आहेत.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची रात्री भेट
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं कळतं. मात्र या बैठकीतील तपशील समोर आलेला नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि वेदांता-फॉक्सकॉन वादाच्या मुद्यांवर ही चर्चा झाली असल्याचा कयास बांधण्यात येत आहे.
इतर राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिंदे गटातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची याचा वाद आता निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाने इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत बुधवारी (21 सप्टेंबर) शिंदे यांनी बैठक घेतली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…