अशोक गहलोत-शशी थरूर यांच्यात होणार सामना ; कोणाचं पारडं जड….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- सव्वाशे वर्षे जुन्या कॉग्रेसचा आगामी अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाणार असून हा रंगतदार सामना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरूर यांच्यात होणार आहे.
कॉग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घेण्यास नकार दिल्यामुळे अध्यक्षासाठी निवडणूक होणे आता अटळ आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे गांधी कुटुंबाची पहिली पसंती आहे. अशात, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर हेही तयारी करून बसले आहेत. अशात, अध्यक्षपदाचा सामना गहलोत विरूद्ध थरूर असा होणार आहे.
महत्वाचे म्हणजे, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवारी संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. ते राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत होते. तिकडे, गहलोत यांनी आज रात्री नेत्यांसाठी ‘डिनर’चे आयोजन केले आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
शशी थरूर यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेवून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर, निवडणूक कुणीही लढू शकतो. यासाठी परवानगी घेण्याची गरज नसून पक्षाची निवडणूक लोकशाही पध्दतीने होईल, असे सूचक विधाण सोनिया गांधी यांनी केले होते.
यामुळे, गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, शशी थरूर यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याच्या निर्णयावर केरळमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केरळहून कॉग्रेसचे खासदार कोडिकुन्निल सुरेश आणि के मुरलीधरन म्हणाले की, कॉग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी सांभाळावे अशी केरळ कॉग्रेसची इच्छा आहे. तर, थरूर यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…