शिंदे-फडणवीस सरकारचा एक निर्णय आणि ST कर्मचारी अडचणीत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे सणासुदीच्या पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार कसा करायचा असा प्रश्न महामंडळासमोर आहे.
एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रूपये निधी मिळत असल्यानं उर्वरित 200 कोटी रूपये आणायचे कुठुन असा प्रश्न महामंडळासमोर आहे. एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासुन 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केलेला नाही. एसटी महामंडळाचं उत्पन्न प्रती महिना 450 कोटी रूपये आहे. तर 650 कोटी रूपये प्रती महिना खर्च येतो. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी 310 कोटी लागतात. तर डिझेलसाठी 250 कोटी रुपयांचा खर्च येतो. तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रूपये खर्च होतात.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…