राज्यातील गुंतवणूक थांबू देणार नाही :- एकनाथ शिंदे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय सुरूच आहे. त्यातच आता एमआयडीसी भूखंड वाटपाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे.
1 जून 2022 नंतरचा भूखंड वाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आला आहे. यावरून शिंदे सरकारवर टीका होत होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्रातील गुंतवणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक थांबू देणार नाही, असं शिंदे म्हणालेत. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
भूखंड वाटपाच्या स्थगितीमुळे उद्योगांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप सरकारवर केला जात होता. यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. नाराज उद्योजक वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून केला आहे.
उद्योगांची गुंतवणूक थांबू नये, यासाठी उद्योगमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. जे भूखंड दिलेले आहेत, त्याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, त्याला स्थगिती दिलेली नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. गुंतवणूक कुठेही थांबता कामा नये, यासाठी तातडीने काम करण्यासाठीच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे नमूद केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…