शनिवार पर्यंत सर्व दूर पाऊस नऊ जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शनिवारपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केला.
त्यानुसार राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांत पुढील चार दिवस जोरधारा कोसळणार असून त्यापैकी नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार, तर नऊ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात १४ ते १६ सप्टेंबर, ठाणे, मुंबईत १५ सप्टेंबर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांत १४ सप्टेंबर, तर पुणे जिल्ह्यात १४ आणि १५ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा नारंगी इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेला आठवडाभर राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. काही भागातील पाऊस मंगळवार पासून ओसरला असला, तरी शनिवारपर्यंत काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातून पाऊस ओसरण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, ठाणे आणि मुंबईत (१४ ते १६ सप्टेंबर, रायगड जिल्ह्यात १६ आणि १७ सप्टेंबर, रत्नागिरी १५ ते १७ सप्टेंबर,
सिंधुदुर्ग १४ ते १६ सप्टेंबर, नंदूरबार आणि नाशकात १५ सप्टेंबर, कोल्हापूर १५ आणि १६ सप्टेंबर,
तर साताऱ्यात १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…