“मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते” ; सेना नेत्यांचा शिंदेंच्या भाषणावर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी औरंगाबादच्या पैठणमध्ये भव्य सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीकास्त्र सोडत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते. अशा आरोप केला आहे.
‘मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैठणमधील फक्त २५ टक्के लोक होते. सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन बाहेरून लोक आणली होती. या सभेला महिलांना ३०० रुपये आणि पुरुषांना ५०० रुपये देऊन गर्दी केलेली होती. हे पैसे देऊन गोळा केलेली सभा होती’. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात कुठेही तथ्य नव्हतं. मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते. असा आरोप खैरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केला आहे.
तसेच, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालला आहात, तर बाळासाहेबांनी शेवटी आदेश दिला होता की, माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा. मग हे त्यांनाच सोडून का चालले आहे ?, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात तुफान गर्दीत सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…