धक्कादायक! हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून मुलीचा छळ ; नवविवाहितेला जाळण्याचाही प्रयत्न ; गुन्हा दाखल ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
हुंड्यासाठी नवविवाहीतेचा छळ व जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरच्या चार मंडळींविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.
महागाव शहरातील मुस्कान शेख सलीम हीचा विवाह काळी दौ.येथील शेख शाहरुख शेख सलीम ह्याच्या सोबत मुस्लिम रितीरिवाजप्रमाने २४/१०/२०२१ रोजी विवाह झाला होता.कुटुंब एकत्रित असल्याने सुरवातीला दोघांचा संस्कार सुरळीत सुरू होता. मुस्कान ही जुम्माग्या साठी आपल्या वडिलांकडे माहेरी गेली.५ दिवसानंतर ती आपल्या सासरी घरी पोहचली. सासूने पैसे का आणली नाही म्हणून मुस्कान कडे तगदा लावला.त्यावेळी मुस्कानने आता कश्याचे पैसे म्हणून सासूला सांगितले.त्यावेळी सासूने तुझ्या वडिलांनी हुंड्यात पैसे कमी दिल्याचे सांगून हुंड्यासाठी छळ करणे सुरू केला. मुस्कानने वडिलांनी दिलेल्या अडीच तोळ्याचे नेकलेस सराफा व्यावसायिकाकडे गहाण ठेवून सासूची इच्छा पूर्ण केली. मुस्कानची तब्येत ठीक नसल्याने सासूने तिला किचन मधून दूध आणून दिले.दूध कडवट लागत असल्याने तिने अर्धा ग्लास तसाच ठेवला. आर्ध्यातासानंतर मुस्कानाला उलट्या व तोंडातून फेस येणे सुरू झाले.त्यामुळे सासऱ्याने तिला पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.आणि तब्येतीत सुधारणा झाल्याने मुस्कानाच्या पतीने तिला परत आणले. मुस्कानचे पती शेख शाहरुख शेख सलीम , सासू सुलताबी उर्फ मुन्नी शेख सलीम (५०) , ननंद शबाना बी शेख युनूस (३२), रूबीनाबी शेख मुंनाफ (३०) ह्यांनी मुस्कानकडे तुझ्या वडिलांनी हूंड्यात पैसे कमी दिल्याचे कारण पुढे करून मुस्कानचा मानसिक व शारीरिक छळ करत त्रास देणे सुरू केले.माझ्या मुलीचा संस्कार सुरळीत राहावं म्हणून मुस्कानच्या वडिलांनी पै पै गोळा करून ४० हजार मुस्कानकडे दिले.आणि मुस्कानने ते पैसे आपल्या पतीकडे दिले. ०६/०९/२०२२ रोजी मुस्कान आपले घरातील कामे आटपून बसली होती.त्यावेळी तिचे पती आणि
नंनद यांनी तिला पकडुन ठेवले व सासु ने घरातुन एक डब्बा आणुन त्या डब्यातील ज्वलनशील पदार्थ मुस्कानच्या पायावर टाकले व माचिस आग लावुन दिल्याने मुस्कान चा डावा पाय व डावा पायाचा सलवार जळाला.त्यामुळे तिच्या पायावर फोडे आले . तरीसुद्धा सासरच्या मंडळींनी तिला दवाखाण्यात न नेता घरातच ठेवले व घरातुन बाहेर निघू दिले नाही. मुस्कान चे पती शाहरुख घरात मोबाईल चार्जिंग ला लावून बाहेर कामामिनित्त बाहेर गेले त्यावेळी शाहरुखच्या मोबाईल वर मुस्कानच्या वडिलांचा कॉल आला.त्यावेळी त्या कॉल ला उत्तर देताना मुस्कानने घडलेली आपबिती वडिलांकडे कथन केल्याने बिंग फुटले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.या प्रकरण मुस्कान आणि तिच्या वडिलांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली.त्यावरून पती शेख शाहरुख शेख सलीम , सासू सुलताबी उर्फ मुन्नी शेख सलीम (५०) , ननंद शबाना बी शेख युनूस (३२), रा.काळी दौलत तालुका महागाव
रूबीनाबी शेख मुंनाफ (३०) रा. सावंगा ता. दिग्रस यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत ४९८ (अ),३२६ (अ),३२३,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…