काँग्रेसच्या पाच खासदारांचा पुन्हा “लेटर बॉम्ब”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कॉंग्रेस पक्षाला गेल्या 3 वर्षां पासून पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने पक्षावर विरोधक वारंवार टिका करत असतात. कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. आणि मतमोजणी 19 ऑक्टोबरला होणार आहे, पण पक्षाच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार कोण कोण आहेत, असा प्रश्न पडला आहे, त्यातच आता कॉंग्रेसच्या खासदारांनी, कॉंग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना 5 खासदारांनी पत्र लिहिले आहे.
या पत्रात खासदारांनी पक्षाध्यक्ष निवडी बाबद चिंता व्यक्त केली आहे.
अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु गेहलोतयांनी हे पद स्विकारण्यास नकार दिला आहे. तर आता अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत आहे. या निवडणूकीचे वेळापत्रक 22 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. यासाठी 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
हे पत्र शशी थरूर, कार्ती चिदंबरम,मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, अब्दुल खालिक या खासदारांच्या नावांचा यात समावेश आहे. शशी थरूर यांनी यापूर्वीही मधुसूदन मिस्त्री यांना तसे पत्र लिहिले आहे. पक्षाने कोणतेही गुप्त माहिती सार्वजनिक करावेत असे आम्ही अजिबात वाटत नाही, उलट आम्ही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी शोधत आहोत, असे या पाच खासदारांनी पत्रात म्हटले आहे. मतदार यादी जाहीर करण्याची त्यांची मागणी चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचेही खासदारांनी मिस्त्री यांना सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…