आयकर विभागाची मोठी कारवाई ; महाराष्ट्रासह देशात 50 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आज आयकर विभागनं देशातील विविध 50 ठिकाणी छापेमारी केली आहे.
दिल्लीपासून, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके पोहोचली असून, चौकशी सुरु आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापे टाकले आहेत. तसेच महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही आयकर विभागानं छापेमारी केली आहे.
आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी देशातील 50 विविध ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे. त्या प्रकरणीच आयकर विभागानं ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये छापेमारी
देशात विविध 50 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. राज्यातील औरंगाबादमध्ये छापेमारी केली आहे.औरंगाबादमध्ये पहाटे चार वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. काही धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबादेत एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर आणि घरावर अशा 4 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. हा व्यापारी शिवसेनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सकाळी चार वाजल्यापासून अतिशय गुप्तपणे ही सगळी कारवाई सुरु आहे.
राजस्थानच्या मंत्र्यावर आयटीचा छापा
राजस्थानमध्ये माध्यान्ह भोजनातून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र यादव आणि मिड डे मील बिझनेस ग्रुपवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण आगार कारखाना आहे. दरम्यान, आतापर्यंत आयकर विभागाच्या टीम 50 ठिकाणी पोहोचल्या आहेत.या छापेमारीत 300 हून अधिक पोलिसांचा सहभाग आहे. इन्कम टॅक्सच्या छाप्यांमध्ये 100 वाहनेही वापरली जात आहेत. जयपूर जिल्ह्यातील कोतपुतळी इथेही छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनाही सोबत घेतले आहे. राजस्थानसोबतच दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंडमध्येही छापेमारी सुरु आहे.
दरम्यान, मागच्याच महिन्यात महाराष्ट्रातच 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केली होती. यावेली 48 वाहनं आणि 50 अधिकारी होते.यामध्ये पंढरपूरमधील उद्योजक अभिजीत पाटील यांच्याशी निगडित असलेल्या तीन साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी टाकल्या होत्या. सोलापुरात सात ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रावर व्यक्ती रडारवर होते. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या होत्या.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…