ठरलं ; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार ; “वर्षा”वर जाणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर होणाऱ्या भेटी मनसे-भाजप युतीचं द्योतक ठरत आहेत.
अश्यात युतीचा महत्वपूर्ण भाग असलेले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत आहे. याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. आता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत.
युतीची चिन्हे
सध्या राज ठाकरे-शिंदे-फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक पाहता युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…