सोनिया गांधी यांच्या आईचे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे निधन झाले आहे. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी त्यांचे इटलीमध्ये निधन झाले आणि मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या सोनिया गांधीही परदेशात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
जयराम रमेश यांनी सांगितले की, ‘सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या असून यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्यांच्यासोबत आहेत.’ सोनिया गांधी बहुधा आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटणार होत्या. त्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार होत्या. दुसरीकडे मात्र, सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…