“श्रीकांत एकनाथ शिंदे यांना युवा सेने अध्यक्ष करा”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समोरच ही मागणी करण्यात आलीय.
विशेष म्हणजे खुद्द एकनाथ शिंदे यांच्या समोरच ही मागणी करण्यात आली. ही मागणी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलीय. आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रींकात शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी, एवढी माझी मागणी आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. मंगळवारी एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. बुलडाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेना युवासेनेचा अध्यक्ष करण्याची मागणी प्रतापराव जा यांनी यावेळी केली. इतकंच नव्हे तर खरी शिवसेना आमचीच आहे, असंदेखील त्यांनी यावेळी म्हटलं.
शिंदे नायक सिनेमाप्रमाणे…
नायक चित्रपट सारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असं म्हणत प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही मागणी केल्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनादेखील याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी थेटपणे यावर भाष्य करणं टाळलं.
बुलडाण्यातील सगळेच शिवसैनिक आपल्याला भेटायला आहेत. त्यांत युवा कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आहेत. त्यांना शिवसेना वाढवायची आहे. त्यासाठी ते सगळेजण प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.
दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खासदार प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाचं भाष्य केलं होतं. आगामी काळात शिंदे गट आणि भाजप एकत्रच निवडणुकीला सामोरा जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. या निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला हा 60 : 40 असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. नुकतंच भाजपचे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकला चलो चा नारा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण होतं. त्यानंतर अखेर प्रतापराव जाधव यांनी भाजपसोबतच्या फॉर्म्युल्यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…