पोलीस , अग्निवीर भरतीसाठी आलेल्या युवकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यावे ; मुख्यमंत्र्यांचे आदेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले आहेत.
देशसेवा करण्यासाठी पोलीस व अग्निवीर भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतो. त्यातील अनेक तरूण गरीब कुटुंबातील असतात. दूरवरून ते भरतीसाठी येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करण्याबरोबरच त्यांना नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख सरनाईक यांनी या पत्रात केला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…