“शिंदे गटातील १० ते १५ आमदार फोन करून म्हणतात , साहेब आमचं चुकलं…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- शिंदे गटातील पैठणचे मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटातील आणखी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काल पैठणमध्ये बोलताना केला होता. त्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट करत शिंदे गटातील १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असून ते आम्हाला फोन करत असल्याचं सांगितलं आहे.
त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.
“शिंदे गटातील काही आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि आम्हाला म्हणतात की, साहेब आमचं चुकलं… आम्हाला माफ करा. असं जवळपास १० ते १५ जण त्यांना माहितीये की आपण फक्त ५० जण आहोत आणि भाजपवाले ११६ आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करून आपल्याला आऊट करतील, त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत.” असं चंद्रकांत खैरे माध्यमाला बोलताना म्हणाले आहेत.
“संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, नशीबाने ते आमदार झाले आहेत.” अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, संदीपान भुमरे यांनी काल पैठण येथे बोलताना ठाकरे गटातले २ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेतील सर्वांत जास्त नेते आमचे आहेत, मग तुम्हीच सांगा खरी शिवसेना कोणती आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला होता. त्यानंतर माजी खासदार खैरे यांनी शिंदे गटाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…