सत्तारूढ आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर..? ; रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ घसरली , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सत्तारूढ आघाडीतील आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया..” असे म्हणत रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती.
त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडू यांचा तोल गेला आणि त्यांनी. “अबे हरामखोराची औलाद, आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. आमच्यामुळेच तू मंत्रीपदाकडे डोळे लावून बसला आहे.”, अशा शब्दात बच्चू कडूंनी राणांवर शाब्दिक हल्ला चढवला. “आम्ही नाचणारे नाही, तर नाचवणारे आहोत.”, अशी टीका देखील बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.
बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघात दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राण यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिपाई आहे. बच्चू कडू म्हणजे सबसे बडा रुपया आहे.”, असे म्हणत राणांनी बच्चू कडू यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यावर बच्चू कडू यांनी लगेच प्रतिक्रिया देणे टाळले होते, पण आता अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे बच्चू कडू यांनी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, तर रवी राणा हे भाजपचे समर्थक आहेत. उभय आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सत्तारूढ आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…