संजय राऊत जेलमध्ये बसून लिहितायत पुस्तक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत सध्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कारागृहात आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आता ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या जेलमध्ये बसून एक पुस्तक लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना वर्तमानपत्र वाचण्यासाठी मिळत आहे. ते त्यातल्या बातम्यांच्या आधारे आपले विचार एका वहीत लिहून ठेवत आहेत. तसंच टिपणंही काढत आहेत. काही पुस्तकंही त्यांना वाचायला मिळाली आहे.
दरम्यान, राऊत सध्या जेलमध्ये स्वतःचं एक पुस्तकही लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्यावर दाखल झालेल्या खटल्यांबद्दलचं हे पुस्तक असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर राऊतांनी जाताजाता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, ही सगळी केस खोटी आहे. माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक आहेत. मी फक्त दोन जणांना ओळखतो. सच के साथ लढ सकते है, झूठ के साथ नही. जेलमध्ये नियमांनुसार वर्तमानपत्रं मिळतात. माझी तब्येत सध्या चांगली आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….