“संतोष बांगर पुन्हा निवडून आले तर एक लाख लीटर दुधाचा मुख्यमंत्र्यांचा अभिषेक करेल”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- अगदी शेवटच्या क्षणी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्याच्या आदल्या दिवशी संतोष बांगर यांनी अश्रू ढासळत आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.
मात्र अचानक पलटी घेतल्याने हिंगोलीतील शिवसैनिक संतोष बांगर यांच्याविरोधात आक्रमक झालेत. त्यांना अनेकदा गद्दार गद्दार असं संबोधण्यात आलं. त्यांनतर संतोष बांगर आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच जुंपली. आता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांना पुढच्या निवडणुकीत निवडून येण्याचं आवाहन ठेवलं आहे.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी निवडून यावे. जर हे निवडणुकीत निवडून आले तर माझी सर्व संपत्ती मी लोकांना दान करायला तयार आहे. त्याचबरोबर आमदार आणि खासदार हे दोन्ही जर निवडून आले तर आमच्या मतदार संघातील लोकांकडून एक एक रूपया जमा करून एक लाख लिटर दुधाचा मुख्यमंत्र्यांचा अभिषेक करेन. माझं त्यांना आवाहन आहे. अस युवा सेनेचे नेते दिलीप घुगे यांनी म्हटलं आहे.
सध्या सत्ता तुमची आहे. ती सत्ता जास्त डोक्यात घालू नका, लोकांची कामे करा, गरिबांना मदत करा. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील आपला पाठिंबा शिंदे गटाला जाहीर केला. त्यामुळे हिंगोलीतील शिवसैनिक चांगलेच आक्रमक बघायला मिळत आहेत. हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोली -नांदेडचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे यांनी लगेच त्यांना पुन्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
दरम्यान, संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांनी राज्यात संतोष बांगर गद्दार आहे. असा जणू ट्रेंन्डच सुरू केला. तसेच संतोष बांगर यांनी देखील शिवसैनिकांना चेतावणी दिली होती. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून संतोष बांगर यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील दिली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….