कृषिमंत्र्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन खाल्ली भाजी – भाकर ; अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी दौऱ्या दरम्यान सत्ताराऺनी अनेक शेतांना भेटी देऊन शेतकऱ्यांना दिले तत्काळ मदतीचे आश्वासन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.२० :- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार तीन दिवशीय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडीत जाऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मोहगाव – सुकळी येथे शेताच्या बंधावर जाऊन शेतकऱ्याच्या घरातील भाजी – भाकरीचा पाहुणचार स्विकारला. तसेच त्यांना त्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासनही दिले.
अनेक ठिकाणी दिल्या सरप्राइज व्हिजिट…..
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तीन दिवशीय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्या दरम्यान कृषिमंत्री सत्तार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या. या दौऱ्या दरम्यान त्यांनी काही भागांना अचानक भेटी दिल्या. रस्त्यावर अनेक ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. शेतकऱ्यांची खरी व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, सुकळी आणि मार्लेगाव येथे भेट देऊन शेतात जाऊन कपाशी, तुर आणि सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ योग्य पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई तात्काळ देण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….