खासदार भावना गवळीनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांधली राखी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशभरात सगळीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. खासदार भावना गवळी यांनीही रक्षाबंधन साजरं केलं आहे. खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. भावना गवळी यांनी फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भावना गवळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधताना दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी मेसेजही लिहीला आहे.

भावना गवळी यांनी लिहीलं आहे की, अनेक वर्षांपासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छोटी बहिण या नात्याने मी राखी बांधत आलेली आहे. आज दिनांक ११/०८/२०२२ रोजी मा पंतप्रधान महोदयांना राखी बांधन्याचे भाग्य प्राप्त झाले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाली.
दरम्यान, ईडीने गवळींना नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांचा मोदींसोबतचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी भावना गवळींना ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाला सपोर्ट केला होता. मागील अडीच वर्षांमध्ये भावना गवळी यांच्यामागे ईडीचा समेमिरा लागला होता. त्यांच्या एका विश्वासू व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. भावना गवळी यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. आता त्या शिंदे गटात दाखल झाल्यामुळे त्यांची ईडी चौकशी संपणार का? असा प्रश्न नेटकरी भावना गवळींना पोस्टमध्ये विचारत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट ; ‘या’ दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार…?
बारामतीत सुनेत्रा पवारांची ‘एकतर्फी’ घोडदौड; अभिजीत बिचुकले, करूणा शर्मांच्या एकूण मतांपेक्षा ‘नोटा’ भारी, पाहा कोणाला किती मते..?
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….