स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हा प्रशासनाद्वारे 9 ऑगस्ट रोजी सायकल रॅली ; उमरी हुतात्मा स्मारकाला करणार अभिवादन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. ७ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यवतमाळ जिल्हा प्रशासन व क्रिडा भारती सायकलींग ग्रुप यांच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत यवतमाळ शहरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेर्तृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी ललिलकुमार वर्हाडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व हौशी सायकल पटू यवतमाळ च्या समता मैदान येथून कळंब, बाभूळगाव मार्गे परत यवतमाळ येथे येणार आहेत. यादरम्यान ते उमरी येथील हुतात्मा स्मारकाला विनम्र अभिवादन करतील. यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड येथे या अभिनव सायकल रॅलीचा समारोप होईल.
याचवेळी यवतमाळ शहरात देखील अजून एका सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली पोस्टल ग्राउंड येथून प्रारंभ होऊन हनुमान आखाडा चौक, पाचकंदिल चौक, नेताजी चौक, जाजू चौक, हिंदी हायस्कूल, माईंदे चौक, विर वामनराव चौक, दाते चौक, सत्यसाई ज्योत मंगल कार्यालय आर्णि रोड, संविधान चौक, लाठीवाला पेट्रोल पंप, नंदुरकर कॉलेज, वाघापूर नाका, स्टेट बँक चौक मार्गे पोस्टल ग्राउंड येथे या सायकल रॅलीचा समारोप होईल. या सायकल रॅलीमध्ये तहसिलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, पोलीस निरीक्षक मनोज केदारे व विविध संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहणार आहे. सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी सकाळी सहा वाजता समता मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….