महागाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर वाशिम येथे अत्याचार ; लॉजवर नेऊन दोघांनी केले शोषण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- महागाव तालुक्यातील थार येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी वाशिम येथील लॉजवर नेऊन आळीपाळीने अत्याच्यार केला. पिडित मुलीच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. राजू उर्फ शामसिंग भैरवसिंग ठाकूर (२५) रा. भईसागर ता.कोट्टा राजस्थान हल्ली मुक्काम पोखरी ता. महागाव आणि शेख नाझीम शेख इमाम (२५) रा.धनोडा अशी आरोपींची नावे आहेत. २ ऑगस्ट रोजी पिडीता आपल्या वडिलांसोबत मामाच्या गावाला जाण्यासाठी हिवरा बस स्थानकावर आली. तेथे तिचे वडील बजुला हॉटेलवर चहा पिण्यास गेले, दरम्यान मुलीची ओळख असलेला शामसिंग ठाकूर आणि त्याचा मित्र शेख नाझीम शेख इमाम हे दोघे मोटरसायकल घेऊन आले. त्यांनी मुलीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविले व पुसद मार्गे वाशिम येथे नेले. तेथे बस स्टँड जवळील एका लॉज मध्ये नेऊन दोघांनी मुलीवर आळीपाळीने शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर पुसद येथील शिवाजी चौकात आणून सोडले व दोघांनी तिथून पोबारा केला. पीडित मुलीने वसंतनगर पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली, त्यानंतर यवतमाळ पोलीसांनी मुलीचे बयान नोंदविले. दोन्ही आरोपी महागांव तालुक्यातील असल्याने येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….