काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे ईडी समोर हजर ; यंग इंडियाच्या कार्यालयावर पुन्हा छापे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसची अडचण संपण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी (ता. ४) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हेराल्ड हाउसमध्येच ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली.
ईडीने काँग्रेसच्या मालकीचे वृत्तपत्र नॅशनल हेराल्डची होल्डिंग कंपनी यंग इंडियनच्या (वाईआय) कार्यालयावर पुन्हा छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (८०) हे हेराल्ड भवन, बहादूर शाह जफर मार्गावर आयटीओजवळ पोहोचले आणि ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. कंपनीचा महत्त्वाचा अधिकारी असल्याने ईडीने यंग इंडियनच्या कार्यालयावर छापे टाकताना त्यांची उपस्थिती मागितली होती. यंग इंडियनच्या शेअरहोल्डर्समध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही नावे आहेत. काँग्रेस अध्यक्षांची कंपनीत ३८ टक्के भागीदार आहे.
बुधवारी ईडीने चार मजली हेराल्ड हाउसचा एक भाग सील केला होता. पुरावे जपण्यासाठी भाग सील केल्याचे ईडीने सांगितले होते. या भागावर कुलूप असल्याने तपासणी करण्यात आली नव्हती. तसेच तपासादरम्यान अधिकृत प्रतिनिधी उपलब्ध नव्हता. यंग इंडियाच्या कार्यालयाची झडती आता थांबवली जाईल. जे काही पुरावे उपलब्ध असतील ते गोळा केले जातील, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि वेब पोर्टल कार्यालय हेराल्ड हाउस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्थित आहे. जेथे संपादकीय विभाग आणि प्रशासकीय विभागाचे कर्मचारी काम करतात. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडद्वारे (AJL) प्रकाशित केले जाते. त्याची होल्डिंग कंपनी यंग इंडियन आहे. वृत्तपत्राचे कार्यालय एजेएलच्या नावाने नोंदणीकृत आहे.
मंगळवारी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले
नॅशनल हेराल्ड, एजेएल, यंग इंडियन डीलमध्ये सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने मंगळवारी हेराल्ड हाउससह डझनभर ठिकाणी छापे टाकले. काही कागदपत्रे, डिजिटल डेटा गोळा करून काही कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर बुधवारी पहाटे एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी परिसर सोडला. ईडीसमोर हजर होण्यापूर्वी खर्गे यांनी राज्यसभेत संसदेच्या चालू अधिवेशनाच्या मध्यावर समन्स पाठवणे योग्य आहे का, असा प्रश्न विचारला. यानंतर खर्गे नॅशनल हेराल्ड इमारतीकडे रवाना झाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…