एलपीजी च्या दरात कपात ; जाणून घ्या कोणत्या शहर मध्ये किती स्वस्त झाले एलपीजी सिलेंडर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.
यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
जाणून घ्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती किती स्वस्त झाल्या?
मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता
दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती.
कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर ती 2095.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2132 रुपये होती.
चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2141 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.
कोणाला फायदा होणार?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत
विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती आज ना महाग ना स्वस्त झाल्या आहेत. 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 6 जुलैच्या दराने उपलब्ध आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…