केसरकरांनी पुन्हा निवडणूक लढवूनच दाखवावी ; होमग्राउंडवर कट्टर शिवसैनिकांचे चॅलेंज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग, 31 जुलै :- दीपक केसरकर यांनी राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लढवून निवडून दाखवावेच असे खुले आव्हान शिवसैनिकांनी सावंतवाडीतच दिले आहे.केवळ स्वार्थासाठी दीपक केसरकर हे शिंदेगटात गेले.
त्यांची ही सवय रोजचीच आहे, अशी टीका करत सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केसरकर यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. माजी पर्यटनमंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार 1ऑगस्ट 2022 रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत.यानिमित्ताने सावंतवाडीत आज मोर्चेबांधणी पाहायला मिळाली. दीपक केसरकर यांच्या होपपिचवर सावंतवाडीत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे मोठ मोठे होल्डिंग लावायला शिवसेनेने सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे जिल्ह्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता माजी राज्यमंत्री, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात त्यांचा ताफा दाखल होणार आहे. केसरकरांच्या सावंतवाडीत गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
या सभेला आदित्य ठाकरे संबोधित करणार असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसैनिकांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सावंतवाडीतील स्वागताकडे सर्वांचं लक्ष लागलं असून शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या होम ग्राउंडवर युवा नेते आदित्य ठाकरे काय बोलणार ?
तसंच, दीपक केसरकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास केव्हाही तयार आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास आणि केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यास यांच्या विरोधात उभा राहून केसरकर यांना आसमान दाखविन असा इशारा शैलेश परब यांनी दिला आहे. यामुळेच शैलेश परब हेच आगामी शिवसेनेचे सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…