मोठी बातमी ; राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी ; मुख्यमंत्र्यांची माहिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत.
तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. त्यानुसार राज्यात आता दहहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबतची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.
“गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात. पण मी मुख्यसचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे”, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गेली दोन वर्षे गणेशोत्सवासह सर्वच सण कोरोनाच्या छायेत अनेक निर्बंधांसह साजरे करावे लागले होते. मात्र यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी नवरात्र कुठल्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीवर यावर्षी कुठलेही निर्बंध नसतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत गोविंदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. याचदरम्यान शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.
प्रताप सरनाईक यांनी केली होती मागणी
दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाप्रताप सरनाईकांनी निवेदन पाठवले होते. यामध्ये आमदार या नात्याने गेली अनेक वर्षे मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं होतं. अखेर आमदारांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…