“मी नोकरी सोडतोय… ; शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करायचं , उद्धव साहेबांना पाठिंबा द्यायचं” ; एका शिवसैनिकांनी दिला शिवसेनेला खुला पाठिंबा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाला खिंडार पडल्यानंतर आता आदित्य ठाकरे हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य भरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता एका शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. २७ जुलै २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.
आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने
दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. ०१ फेब्रुवारी २००२ पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. ३ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारा बहुधा राज्यतील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या एकाच चर्चा सुरू आहे.
दरम्यान, नुकतेच शिंदे गटात गेलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेने प्रवेश केला. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनीही शिवबंधन हाती बांधले आहे. ज्यांना मोठे केले ते निघून गेलेत. आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचे आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे, पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, असे म्हणत शिंदे गटाला इशाराही दिला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…