राष्ट्रपतीपदी पोहोचणे माझे नव्हे देशातील प्रत्येक गरिबांचे यश :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. आज देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात शपथ घेतली.
सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. ‘राष्ट्रपतीपदी माझी निवड केल्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करते.
ही जबाबदारी मिळणं हे माझं सौभाग्य आहे. मी राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले हे माझं वैयक्तिक यश नाही. तर हे देशातील प्रत्येक गरिबांचे यश आहे, असं द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील सर्वच पक्षाचे नेते, सर्व केंद्रीय मंत्री आणि सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींचं अभिनंदन केलं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…