शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत :- राज ठाकरे यांची कडवट टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलतात एक आणि करतात दुसरेच. यावरून ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक आमदार मिळूनही मुख्यमंत्री पदावर शिवसेनेने दावा केला होता. विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे ठरल्याचे उद्धव सांगत आहेत. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे निवडणुकीच्या प्रचारसभेत जाहीरपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे सांगत होते. त्यावेळी उद्धव गप्प का बसले, असा सवाल राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. जेव्हा एखादी व्यक्ती नशिबालाच आपले कर्तृत्व समजू लागते, तेव्हा त्या व्यक्तीचा र्हास सुरू होतो, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. राज म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर बाळासाहेबांच्या नावापुढील हिंदूहृदयसम्राट ही उपाधी काढून टाकली. उर्दूमधील एका होर्डिंगवर बाळासाहेबांच्या अगोदर जनाब लावले. सत्तेसाठी त्यांनी हे होऊ दिले. यावरून ते ढोंगी असल्याचे स्पष्ट होते. उद्धव ठाकरे आजारी असताना मंत्रालयात जात नव्हते. आता शिवसेनेचे आमदार बाहेर पडल्यापासून रोज शिवसेना भवनात जात आहेत, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बेगडी हिंदुत्वावर टीका केली.
शिंदे गट मनसेत विलीन होणार असेल तर विचार करू…
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे आपले जुने सहकारी आहेत. त्यांचा गट मनसेत विलीन होणार असल्याची चर्चा मी ऐकली. या सर्व तांत्रिक बाबी आहेत. मात्र जर शिंदे यांना गरज पडली आणि त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला तर आपण त्या 40 आमदारांना मनसेत विलीन करण्याबाबत विचार करेन.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…